Ad will apear here
Next
‘आरोग्यसेवा पोहोचविताना समग्र दृष्टीकोन महत्त्वाचा’
‘एस हॉस्पिटल’चे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश पाटणकर यांचे मत
पुणे : ‘सात एप्रिल रोजी साजरा झालेल्या जागतिक आरोग्य दिवसाची संकल्पना युनिर्व्हसल हेल्थ केअर होती. भारताने आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून हे ध्येय साकार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पाऊल टाकले आहे, जेणेकरून सर्वांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यात मदत होईल; मात्र हे करत असताना वैद्यकीय चिकित्सेमध्ये समग्र दृष्टीकोन ठेवणे गरजेचे असून, असे केल्यास सर्व रुग्णांना त्याचा फायदा होईल,’ असे मत एस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले.

‘उपचारासाठी पूरक साह्य म्हणून योगा, आयुर्वेद, होमिओपॅथी यांसारख्या इतर शास्त्रीय शाखांमधील वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित मान्यताप्राप्त उपचारपद्धतींचा अवलंब केला पाहिजे. विशेषत: जीवनशैलीशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी यांचा वापर केला जाऊ शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तज्ज्ञांनी एकत्र येऊन याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. एस हॉस्पिटलमध्ये गेली दोन-तीन वर्षे विशेष करून आहार आणि पोषणासाठी आम्ही समग्र दृष्टीकोन ठेऊन रुग्णांची चिकित्सा करीत आहोत व याचे उत्तम परिणाम दिसून येत आहेत,’ असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZTUBZ
Similar Posts
एस हॉस्पिटलमध्ये विशेष योग कार्यशाळा उत्साहात पुणे : येथील एस हॉस्पिटलमधील एस ट्रान्सडीसीप्लिनरी रिसर्च सेंटरमध्ये ओपल फाउंडेशनमधील अंध व अपंग विद्यार्थांसाठी विशेष योगासन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अंध व अपंग मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली ही पुण्यातील पहिलीच योग कार्यशाळा होती.
पुण्यात योगासन स्पर्धेला प्रतिसाद पुणे : एस ट्रान्स डिसिप्लिनरी रिसर्च सेंटर, एस हॉस्पिटल, सागर पाटणकर व आरोग्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योगासन स्पर्धा २०१९’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटांतील व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते.
प्रसूतीनंतर मातांसाठी औषधी वनस्पती उपचार उपयुक्त पुणे : ‘प्रसूतीनंतर आपल्या तान्ह्या बाळाची काळजी घेण्यासोबतच आईने स्वतःची काळजी घेणे देखील तितकेचे महत्त्वाचे आहे. प्रसूतीनंतर स्त्रीचे शरीर कमकुवत व अशक्त झालेले असते. मातेच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि शरीराचे संरक्षण करण्यासाठी आयुर्वेदात काही औषधी वनस्पती व तेलांचा वापर सुचवण्यात आला आहे
वैद्य पाटणकर दांपत्याची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड पुणे : येथील आरोग्यवर्धिनी चिकित्सालयाचे वैद्य डॉ. हरीश पाटणकर व डॉ. स्नेहल पाटणकर या दाम्पत्याची आठव्या जागतिक आयुर्वेद परिषदेसाठी निवड झाली आहे. अहमदाबाद येथील गुजरात युनिव्हर्सिटी कॉन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर येथे होणाऱ्या परिषदेत डॉ. पाटणकर दाम्पत्य ‘केस विकारांच्या निदानासाठी आधुनिक पद्धतीचा उपयोग व वापर’ या विषयावर प्रबंध सादर करणार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language